गावातील सुविधा व विकासकामे

गावाचा विकास हा ग्रामपंचायतीच्या योजनांवर व शासनाच्या उपक्रमांवर अवलंबून असतो. प्राथमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, वीजपुरवठा, पाणीपुरवठा योजना, रस्ते हे गावाच्या प्रगतीचे महत्त्वाचे टप्पे आहेत.गावात मोठ्या प्रमाणात घरकुलचे काम चालू आहे.शेतकऱ्यांना सिंचन विहीर व गुरांचा गोठा मंजूर करण्यात आला आहे.गावांमध्ये महिला बचतगट सक्रिय असून ते आर्थिक सबलीकरणात मोठा वाटा उचलत आहेत. तरुण मंडळे क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांतून गावाचा विकास घडवत आहेत.गावात प्रत्येक गल्लीत सिमेट कॉंक्रीट रस्ता करण्यात आला आहे.
शासनाच्या जलसंधारण, वृक्षारोपण, स्वच्छ भारत अभियान अशा योजना गावात राबवल्या जात आहेत. काही ठिकाणी सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण,कंपोस्ट खत निर्मिती अशा पर्यावरणपूरक उपक्रमांतून आदर्श ठरत आहेत.तसेच स्मशान भूमीत बैठक शेड चे काम करण्यात आलेले आहे.व सौर पथदिवे,रस्ताच्या बाजूला led हायमस्ट बसविण्यात आलेले आहे.मुलांना व्यायाम करण्यासाठी जिम व वाचनालय चालू करण्यात आलेले आहे.गरजू लोकांना व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायत शॉपिंग गाळे देण्यात आलेले आहे.नविन खासदार निधीतून महादेव मंदिरात सभा मंडप बांधण्यात आलेले आहे.पावसाचे पाणी संकलन करण्यासाठी शासकीय इमारतीवर रेन वाटर हार्वेस्टिंग बसविण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share
Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
Telegram
WhatsApp
तक्रार निवारण फॉर्म